|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » दक्षीण भारतातील भव्य शिवजयंती साजरी करणार

दक्षीण भारतातील भव्य शिवजयंती साजरी करणार 

आमदार हसन मुश्रीफ

प्रतिनिधी/ कागल

दक्षिण भारतातील सर्वात भव्य छ. शिवाजी महाराज जयंती मंगळवार दि. 19 फेब्रुवारी रोजी कागल शहरात साजरी केली जाणार आहे. ही जयंती लोकोत्सव म्हणून साजरी करण्यासाठी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी जयंतीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

कागल येथे जयंती नियोजनासाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष युवराज पाटील होते.

आमदार मुश्रीफ म्हणाले, लोकांच्या सहभागामुळे शहरातील रस्ते देखील अपुरे पडून विरोधकांच्या पोटात गोळा उठेल, असे दिमाखदार नियोजन करण्यात येईल. जयंतीसाठी छ. शिवाजी महाराज यांचे वंशज आमदर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मुश्रीफ फौंडेशन आणि आठरा पगडजातीच्या जनतेच्यावतीने छ. शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात येणारा आहे. या जयंतीला छ. शिवाजी महाराज यांचे वंशज आमदार शिवेद्रसिंहराजे भोसलेहे उपस्थित राहणार आहेत. दक्षिण भारतातील सर्वात मोठी भव्य आणि दिव्य जयंती साजरी करण्यात येणार आहे. या जयंतीला गावागावातील लोकांनी आपल्या कुटूंबासह सहभागी व्हावे, असेही आवाहन केले.

जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने म्हणाले, छ. शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला, गडहिंग्लजमध्ये पुतळा उभारला, सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या नावाने सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची उभारणी करुन त्यांचे तर जिवंत स्मारकच उभा केले आहे. दरवर्षी छ. शिवाजी महाराज यांची जयंती मोठय़ा प्रमाणात साजरी करण्यात येते. यंदाही साजऱया होणाऱया जयंतीला तालुक्यातील सर्वांनी भगव्या टोप्या परिधान करुन सहभागी व्हावे. मिरवणुकीमध्ये प्रबोधनपर ऐतिहासिक आणि पारंपारिक पध्दतीची मात्र दक्षिण भारतातील सर्वात भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे सांगितले.

स्वागत नितीन दिंडे यांनी केले. यावेळी विकास पाटील, माजी नगराध्यक्षा            प्रविणसिंह पाटील, अजित कांबळे, संजय हेगडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्षा सौ. माणिक माळी, घोरपडे कारखान्याचे चेअरमन नविद मुश्रीफ, रमेश माळी, प्रकाश गाडेकर, प्रविण भोसले, दत्ता पाटील आदींसह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.