|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत उदगाव टेक्निकलचे यश

आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत उदगाव टेक्निकलचे यश 

वार्ताहर/ उदगाव

येथील डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत नेत्रदीपक यश संपादन केले. 25 किलो वजन गटामध्ये   ओंकार संतोष भोपळे यांने गोल्ड मेडल, तसेच  28 किलो वजन गटात करुणा संजय सासणे, पूर्वा गजानंद गडकरी, वैभवी सतिश गडकरी यांनी सिल्व्हर मेडल मिळविले. 45 किलो वजन गटात प्रतिमा सुभाष ठोमके हिने गोल्ड मेडल पटकावले.

मुख्याध्यापक एस. एस. जंगम, पर्यवेक्षक राजेंद्र मोरे यांची प्रेरणा तर कराटे प्रशिक्षक सचिन पिसाळ, आर. एन. नलवडे, एस. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विध्यार्थी, विध्यार्थीनीचा सत्कार शाळेच्या व विविध संस्था च्यावतीने करण्यात आला.

Related posts: