|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » प.पू. सन्मतिसागरजी महाराजांचा 81 व्या जन्मजयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम

प.पू. सन्मतिसागरजी महाराजांचा 81 व्या जन्मजयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम 

वार्ताहर/ उदगाव

परमपूज्य तपस्वी सम्राट आचार्य श्री सन्मतिसागरजी महाराज यांच्या 81 व्या जन्मजयंती दिवस निमित्त येथील अतिशय क्षेत्र कुंजवन येथे मंगळवार 12 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

परमपूज्य मुनीकुंजर आचार्य श्री आदीसागरजी महाराज अंकलीकर यांचे तृतीय पट्टाधीश परमपूज्य आचार्य श्री सन्मतिसागरजी महाराज यांचे उदगाव येथील समाधीस्थळी त्यांच्या 81 व्या जन्मजयंती दिवसानिमित्त श्री ब्रम्हनाथ कुंजवन पुरातन जैन मंदिर व सकल दिगंबर जैन समाजाच्यावतीने मंगळवार 12 रोजी सकाळी 8.30 ते 10 वेळेत मूलनायक भगवंतांचा पंचामृत अभिषेक व आचार्यश्रीच्या मूर्तीवर तसेच चरण पादुकावर पंचामृत अभिषेक होणार आहे. सकाळी 10 ते 12.30 पर्यंत तपस्वी सम्राट आचार्य श्री सन्मतिसागरजी महाराज विधान होणार असून दुपारी 2 ते 5 या वेळेत रक्तदान शिबिर तसेच दंत व मुखरोग निदान शिबिर आणि आयुर्वेदिक निदान व चिकित्सा शिबिर याचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ गरजूंनी घ्यावा, असे आवाहनही संयोजकांकडून करण्यात आले आहे. यावेळी आचार्य श्रींचे भक्त मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत.

 

Related posts: