|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी जिल्हा दौऱयावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी जिल्हा दौऱयावर 

प्रतिनिधी/ सांगली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दि. 15 फेब्रुवारी रोजीच्या संभाव्य तासगाव येथील कार्यक्रम शिस्तबद्ध व नियोजनानुसार पार पडावेत, यासाठी सर्व यंत्रणांनी काटेकोरपणे कर्तव्य बजावावे, असे आदेश जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी दिले.

तासगाव येथे दौऱयाच्या पूर्वतयारी आढावा प्राथमिक बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर, तहसीलदार दीपक वंजाळे आदी उपस्थित होते.

तासगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 15 रोजी संभाव्य दौरा आहे. या दौऱयात त्यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती शिल्पांचे अनावरण व लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच, सामाजिक अधिकारीता शिबिरांतर्गत सहा हजार 656 दिव्यांगांना निःशुल्क सहाय्यक उपकरण वितरण करण्यात येणार आहे. तसेच, तासगाव शहरासाठी भुयारी गटार योजना, नगरपालिका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भूमिपूजन, नगरपालिका शाळांना टॅब वाटप तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 356 कुटुंबांना घरकुल निधी वाटप आदि कार्यक्रमही होणार आहेत.

या कार्यक्रमांसाठी सुरक्षा व्यवस्था, हेलिपॅड व्यवस्था, हेलिपॅड ते कार्यक्रमस्थळ रस्ते मार्ग व्यवस्था, वाहन व्यवस्था, सर्व अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज रूग्णवाहिका, अग्निशामक वाहने, आरोग्य, वाहतूकव्यवस्था, पार्किंग, मोबाईल स्वच्छतागृह आदी बाबींचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्यासह उपस्थित अधिकाऱयांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन पाहणी केली. संबंधित अधिकाऱयांना योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Related posts: