|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » रत्नागिरीत चोरटय़ांचा धुमाकुळ सुरूच

रत्नागिरीत चोरटय़ांचा धुमाकुळ सुरूच 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

शहरालगत असलेल्या मिरजोळे रेल्वे कॉलनी येथील सदनिका फोडून लाखोंचा ऐवज चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच रविवारी रात्री चोरटय़ांनी शिवाजीनगर भागात 2 सदनिका फोडल्याची घटना समोर आली आह़े सुदैवाने या सदनिका काही दिवसांपासून बंदच असल्याने चोरटय़ांच्या हाती काहीच लागले नाह़ी मात्र शहरात दररोज घडणाऱया या चोऱयांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आह़े

शिवाजीनगर परिसरातील संस्कृती गार्डन सोसायटीमधील दिलावर हुसेन आगा (66, ऱा शिवाजीनगर, रत्नागिरी) व श्रीराम राणे यांच्या सदनिका चोरटय़ांनी फोडल्याचे त्यांच्या शेजाऱयांना आढळून आल़े दरम्यान दिलावर हुसेन हे सिंधुदुर्ग येथे घरगुती कामासाठी गेले होत़े तर श्रीराम राणे हे मुंबई येथे वास्तव्यास आहेत़ याच गोष्टीचा फायदा उठवत चोरटय़ांनी रविवारी रात्रीच्या सुमारास या सदनिकांना आपले लक्ष केल़े

चोरटय़ांनी या दोन्ही सदनिकांचे मुख्य दरवाजे लोखंडी हत्याराने तोडून आत प्रवेश केल्याचे दिसत आह़े मात्र हुसेन व रोण यांनी आपल्या घरामध्ये कोणताही किमती ऐवज न ठेवल्याने चोरटय़ांच्या हाती या ठिकाणी काहीच लागले नाह़ी घटनेची खबर मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, शहर पोलीस निरिक्षक हेमंतकुमार शहा, सहाय्यक पोलीस निरिक्षक वराळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केल़ी

दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या श्वानपथकाला कोणतेही महत्वाचे धागेदोरे हाती लागलेले नाहीत़ मिरजोळे येथे शनिवारी झालेल्या चोरीनंतर 24 तासात पुन्हा सदनिका फोडण्यात फोडण्यात आल्याने पोलीसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. बंद सदनिकाची रेकी करूनच त्या फोडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आह़े या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आह़े