|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मागणी पूर्ण न केल्यास अखिल गोवा खाजगी बसमालक संघटनेतफ्xढ आंदोलन

मागणी पूर्ण न केल्यास अखिल गोवा खाजगी बसमालक संघटनेतफ्xढ आंदोलन 

प्रतिनिधी/ पणजी

अखिल गोवा खाजगी बसमालक संघटनेतफ्xढ जुनता हाऊस इमारत पणजी येथे परिवाहन संचालनालयाच्या निष्क्रियतेविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी या संघटनेचे अध्यक्ष सुदीप ताम्हणकर व इतर खाजगी बसमालक संघटनेचे सदस्य उपस्थित होते. प्रसंगी संघटनेतफ्xढ सरकारकडे विविध मागण्या करण्यात आल्या असून त्या जर पूर्ण झाल्या नाही तर याच इमारतीत धरणे आंदोलन करण्याचा इशारा अध्यक्ष सुदीप ताम्हणकर यांनी दिला.

सुदीप ताम्हणकर यांनी सांगितले की, प्रत्येक बस स्टॅण्डवर एक घडय़ाळ असणे आवश्यक आहे व यासाठी आम्ही सरकारकडे अर्जही केला होता. घडय़ाळ नसल्याने वेळेच्या बाबतीत सर्वांनाच त्रास होत आहे. तसेच तिकिट दरवाढीसंदर्भात करण्यात आलेल्या निवेदनावर काही प्रयत्न होताना दिसत नाही. याचा निषेध म्हणून हल्लीच खाजगी बससेवाही बंद ठेवण्यात आली होती. खाणीवर अवलंबूंन असलेल्यांना सरकारने भिकेला लावले, टॅक्सी चालकांनाही त्रास करत आहे व आता आम्हालाही भिकेला लावण्याचा विचार सरकारचा असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली.

सरकार सरकारी अधिकाऱयांना पगार देत नाही का? हा सवाल यावेळी ताम्हणकर यांनी उप†िस्थत केला. ते म्हणाले की पेडणे, म्हापसा, काणकोण याठिकाणचे रस्ता सुरक्षा अधिकारी आमच्याकडून लाच घेत आहे. त्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाढला आहे. ही माहिती आम्ही परिवहन संचालक तसेच वरिष्ठ अधिकाऱयांना देऊनही त्यांच्यावर कार्यवाही का होत नाही. सरकारकडे त्यांना पगार द्यायला पैसे नाहीत का? हे अधिकारी नारळ, इतर सामानदेखील मागत असल्याचे ताम्हणकर यांनी स्पष्ट केले.