|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दुष्काळी भागातील पाणी समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्या

दुष्काळी भागातील पाणी समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्या 

@ बेळगाव / प्रतिनिधी

जिल्हा पंचायतचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी गुरुवारी बेळगाव तालुक्मयातील पंचायत विकास अधिकाऱयांची (पीडीओ) बैठक घेतली. पीडीओंना आपल्या कामाची जबाबदारी आणि कर्तव्य याची जाणीव करून दिली. आपले काम जबाबदारीने करण्याची सूचना सीईओ डॉ. राजेंद्र यांनी पीडीओंना यावेळी केली. विशेषत: दुष्काळी भागातील पाणी प्रश्न आणि रोजगार प्रश्नावर लक्ष देण्याची सूचना करण्यात आली.

सध्या जिल्हय़ात अनेक तालुक्मयांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पाण्याची समस्याही गंभीर बनली आहे. अशा परिस्थितीत पीडीओंनी जबाबदारीने काम करावे. दुष्काळी भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, रोजगार हमी योजनेंतर्गत सध्या असणाऱया कामाच्या दिवसात वाढ करून ते 150 दिवसांपर्यंत करण्यात आले आहे. दुष्काळी भागातील नागरिकांना कामासाठी बाहेर जावे लागू नये यासाठी या योजनेतून काम देण्यात यावे. विशेषत: दिव्यांग व्यक्तींनाही काम देण्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी सूचना सीईओ डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी केली.

जिल्हय़ातील विविध तालुक्मयातील पीडीओंशी सीईओ डॉ. राजेंद्र यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला आणि महत्त्वाच्या सूचना केल्या. दुष्काळी तालुक्मयात पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक ठिकाणी कूपनलिकांची खोदाई करण्याबरोबरच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा. दुष्काळी परिस्थितीमुळे नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात यावी, अशी सूचना यावेळी त्यांनी केली. जिल्हा पंचायतच्या व्हीडीओ कॉन्फरन्स सभागृहात ही बैठक झाली. बैठकीस बेळगाव तालुक्मयातील बहुसंख्य पीडीओ उपस्थित होते.