|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अष्टे येथे शिवपुतळय़ाची जल्लोषात मिरवणूक

अष्टे येथे शिवपुतळय़ाची जल्लोषात मिरवणूक 

वार्ताहर/ सांबरा

अष्टे (ता. बेळगाव) येथे नवक्रांती युवा संघटना व ग्रामस्थांच्यावतीने बसविण्यात येणाऱया छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळय़ाची गावात जल्लोषी वातावरणात मिरवणूक काढण्यात आली.

येथील कलमेश्वर गल्लीमध्ये शिवरायांची आरती म्हणून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर संभाजी गल्ली, शिवाजी गल्ली, पाटील गल्लीतून मिरवणूक निघाली. यावेळी आरती ओवाळून शिवरायांच्या पुतळय़ाचे भव्य स्वागत करण्यात आले. महिलावर्गाकडून मिरवणूक जाणाऱया मार्गावर आकर्षक रांगोळय़ा रेखाटण्यात आल्या होत्या. गावात सर्वत्र उभारलेल्या भगव्या कमानी व भगवे ध्वज यामुळे गाव भगवेमय झाले होते. मिरवणुकीत वारकरी भजनी मंडळ, कलावती भजनी मंडळ सहभागी झाले होते. तसेच मिरवणुकीत नवक्रांती युवा संघटनेसह गावातील सर्व युवक मंडळांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मंगळवार दि. 12 रोजी दुपारी 2 वाजता गावातील ज्ये÷ नागरिकांकडून शिवपुतळय़ाची प्रति÷ापना करण्यात येणार आहे.