|Sunday, October 20, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात आरटीआय कार्यकर्त्याचा मृतदेह ताम्हिणी घाटात आढळला

पुण्यात आरटीआय कार्यकर्त्याचा मृतदेह ताम्हिणी घाटात आढळला 

ऑनलाईन टीम /  पुणे : 

मागील काही दिवसांपासून बेपत्ता असलेले पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा मृतदेह ताम्हिणी घाटात आढळला. शिरसाट यांचा खून झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विनायक शिरसाट 5 फेब्रुवारीपासून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बेपत्ता होते. त्यांचे  अपहरण झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी दिली होती. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी तपासही सुरु केला होता. शिरसाट यांचे  शेवटचे लोकेशन ताम्हिणी घाटात दाखवत होते त्यानुसार शोध घेत असताना पोलिस ताम्हिणी घाटात पोहोचले. तिथे सोमवारी (11 फेब्रुवारी) दुपारी त्यांचा मृतदेह सापडला. पोलिस अधिक तपास करत आहेत.