|Sunday, April 21, 2019
You are here: Home » Top News » पुलवामा चकमकीत दोन जवान शहीद , एका दहशतवाद्याचा खात्मा

पुलवामा चकमकीत दोन जवान शहीद , एका दहशतवाद्याचा खात्मा 

ऑनलाईन टीम / श्रीनगर 

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (12 फेब्रुवारी) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तर दोन जवान शहीद झाले आहेत. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.

 

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू झाली आहे. पुलवामामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

 

Related posts: