|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » प्रियंका गांधींच्या रॅलीत कार्यकर्त्यांचे मोबाईल लंपास, काँग्रेस नेत्यांचे धरणे आंदोलन

प्रियंका गांधींच्या रॅलीत कार्यकर्त्यांचे मोबाईल लंपास, काँग्रेस नेत्यांचे धरणे आंदोलन 

ऑनलाईन टीम / लखनौ :

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सोमवारी (11 फेब्रुवारी) उत्तर प्रदेशची राजधनी लखनौ येथे केलेला रोड शो सुपरहिट झाला. त्याबरोबरच प्रियंका गांधी यांची प्रत्यक्ष राजकारणातील एंट्रीही दणक्मयात झाली. प्रियंका यांच्या रोड शोमुळे उत्तर प्रदेशमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. तसेच लखनौमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती. या प्रचंड गर्दीचा चोरांना मात्र मोठा फायदा झाला आहे. रोड शोमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचे महागडे स्मार्टफोन चोरीला गेले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांना जेव्हा या चोरीची माहिती मिळाली तेव्हा पोलिसांवर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत धरणे आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.

 

कन्नौज आणि बाराबंकी येथून अनेक कार्यकर्ते प्रियंका आणि राहुल गांधींच्या रोड शोमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते जेव्हा कानपूर रोड येथे पोहोचले तेव्हा चोरांनी त्यांचे स्मार्टफोन आणि अन्य महत्त्वाचे सामान चोरले. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. चोरांनी सव्वा लाखाचा स्मार्टफोन चोरी केल्याचा दावा शान अल्वी यांनी दावा केला आहे. तसेच चोरांनी अनेक नेत्यांच्या खिशातील हजारो रुपये, लायसन्स आणि एटीएम कार्डसहित अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांची चोरी केली. चोरी झाल्याची माहिती मिळताच संतप्त काँग्रेस नेत्यांनी एका तरुणाला मारहाणदेखील केली. तरुणाला पकडून पोलीस ठाण्यात गेले आणि धरणे आंदोलनाला सुरुवात केली. मात्र तरीही पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.