|Thursday, February 27, 2020
You are here: Home » Top News » जिग्नेश मेवानींचे निमंत्रण कॉलेजच्या विश्वतांकडून रद्द ; प्राचार्यांनी दिला राजीनामा

जिग्नेश मेवानींचे निमंत्रण कॉलेजच्या विश्वतांकडून रद्द ; प्राचार्यांनी दिला राजीनामा 

ऑनलाईन टीम / लखनौ :

गुजरातच्या अहमदाबाद शहरातील एच. के. आर्ट्स कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात आमदार जिग्नेश मेवानी यांना प्रमुख पाहुणे म्हणून पाठवलेले निमंत्रण कॉलेजच्या विश्वस्तांकडून अचानक रद्द करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हे निमंत्रण रद्द झाल्याने याचा निषेध म्हणून कॉलेजचे प्राचार्य हेमंतकुमार शाह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मेवानी हे सातत्याने भाजपावर टीका करीत असल्याने विश्वस्तांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यात ज्येष्ठ लेखिका नयनतारा सेहगल आणि ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना अशाच प्रकाराला सामोरे जावे लागले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सेहगल यांना प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रण पाठवल्यानंतर आयोजकांकडून ते अचानक रद्द करण्यात आले होते. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील एनजीएमएमध्ये भाषणादरम्यान औचित्यभंगाचा मुद्दा पुढे करीत पालेकरांचे भाषण मध्येच थांबवण्यात आले होते. यामुळे सरकारविरोधत बोलणाऱयांची मुस्काटदाबी होत असल्याचा आरोप होत असताना आता मेवानींबाबतही असाच प्रकार घडल्याने यावरुन वाद होण्याची चिन्हे आहेत.

Related posts: