|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » राफेलच्या मुद्यावर राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर पाच आरोप

राफेलच्या मुद्यावर राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर पाच आरोप 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :

राफेल करारासंदर्भात मोदी सरकार आज (12 फेब्रुवारी) सीएजीचा अहवाल संसदेत सादर करणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आजही पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर प्रश्नांचा भडिमार केला. ते म्हणाले की, राफेल डीलमध्ये एक ई-मेल समोर आला आहे. या ई-मेलनुसार परराष्ट्र सचिव आणि एचएएलच्या आधी अनिल अंबानींना राफेल कराराबाबत अनिल अंबानींना माहिती होती.

 ई-मेलची कॉपी झळकावत राहुल गांधी म्हणाले की, आता हे प्रकरण केवळ भ्रष्टाचाराचेच नाही तर गोपनीयतेच्या कायद्याचे उल्लंघनही आहे. गोपनीय माहिती शेअर केल्याप्रकरणी पंतप्रधन मोदींवर खटला चालायला हवा. यात कोणीही वाचू शकणार नाही. जे लोक यात सामील आहेत, त्यांना सगळय़ांना जेलमध्ये जावं लागेल. हे देशद्रोहाचं प्रकरण आहे.