|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » मंगळवेढय़ात चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

मंगळवेढय़ात चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या 

ऑनलाईन टीम / मंगळवेढा:

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन दारुड्या नवऱ्याने पत्नीची हत्या केल्याची घटना मंगळवेढा तालुक्मयातील डोणज हद्दीत सोमवारी रात्री घडली. सखुबाई महादेव गायकवाड असे मृत महिलेचे नाव असून आरोपीचे नाव महादेव श्रीमंत गायकवाड आहे. घटनेनंतर पती पसार झाला असून याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   मिळालेल्या अधिक माहितीनुसार, महादेव गायकवाड याने पत्नीच्या चारिर्त्यावर संशय घेऊन तिला लाकडी दांडक्मयाने व धरदार हत्याराने तिच्या गालावर कपाळावर डोक्याजवळ मारून जखमी केले. नंतर गळा आवळून तिचा खून केला. घटनेनंतर घराला बाहेरून कुलूप लावून तो पळून गेला. सकाळी ही घटना लक्षात आली. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.