|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » रवी पुजरानंतर आता ‘डी’ कंपनी लक्ष्य

रवी पुजरानंतर आता ‘डी’ कंपनी लक्ष्य 

ऑनलाईन टीम / मुंबई :

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याला सेनेगल येथे अटक केल्यानंतर त्याला भारतात आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुजारीनंतर आता कोणाचा क्रमांक लागतो हा प्रश्न सध्या गुन्हे जगतात चर्चिला जाऊ लागला आहे.

क्राइम ब्रँचच्या एका अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची संपूर्ण टोळी परदेशात आहे. मात्र, डी कंपनीव्यतिरिक्त अनेक अंडरवर्ल्ड डॉन विविध देशांमध्ये राहून मुंबईतला कारभार हाताळत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या सर्वांना अटक करण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी देखील अद्याप मुंबई पोलिसांना यश मिळालेले नाही. जे अंडरवर्ल्ड डॉन परदेशात आहेत, त्यांमध्ये गुरू साटमचा देखील समावेश आहे. साटम पूर्वी छोटा राजन टोळीसोबत होता. गेल्याच महिन्यात मुंबई पोलिसांनी त्याचा खास माणूस कृष्णकुमार नायरला अटक केली होती.