|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » चीन, भारत झाडे लावण्याच्या बाबतीत आघाडीवर !

चीन, भारत झाडे लावण्याच्या बाबतीत आघाडीवर ! 

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :

अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने जाहीर केलेल्या ताज्या संशोधन अहवालातील निष्कर्ष पाहून थक्क व्हाल. या अहवालानुसार, भारत आणि चीन झाडे लावण्याच्या बाबतीत जगात सर्वात पुढे आहेत. सोमवारी जारी केलेल्या अहवालात असे म्हटले, जग 20 वर्षं मागे जसे होते त्या तुलनेत अधिक हिरवंगार झाले आहे. हा अहवाल नासाच्या उपग्रहाकडून मिळालेली आकडेवारी आणि विश्लेषणावर आधारित आहे.

या अभ्यास अहवालाचे लेखक ची चेन म्हणाले, ‘एक तृतीयांश वृक्षवल्ली चीन आणि भारतात आहे, पण पृथ्वीवरील जंगलांच्या एकूण जमिनीपैकी केवळ 9 टक्के जमीन या दोन देशांमध्ये आहे.’ चेन पुढे म्हणाले, ‘जास्त लोकसंख्या असणाऱया या देशांमध्ये अधिक वापरामुळे जमीनीची धूप होणे साधारण बाब असताना पुढे आलेला हा अभ्यास अचंबित करणारा आहे.’ नेचर सस्टेनेबिलिटी जर्नलमध्ये 11 फेब्रुवारी रोजी हा अभ्यास अहवाल प्रसिद्ध झाला. यानुसार, 2000 ते 2017 च्या ताज्या उपग्रह आकडेवारीनुसार, चीन आणि भारतात अधिक हिरवळ आहे. चीनमध्ये वृक्षवल्लीचे प्रमाण जगाच्या तुलनेत 25 टक्के तर वनीकरण क्षेत्र केवळ 6.6 टक्के आहे. या अभ्यास अहवालात असे म्हटले. चीनमध्ये वनक्षेत्र 42 टक्के तर कृषीक्षेत्र 32 टक्के असल्याने हिरवाई आहे, भारतात कृषीक्षेत्र 82 टक्के असल्याने हिरवाई आहे. भारतात वनीकरण क्षेत्र केवळ 4.4 टक्के आहे. भारत आणि चीनमध्ये 2000 नंतर खाद्य उत्पादनात 35 टक्के वाढ झाली आहे. नासाच्या टेरा तसेच ऍक्वा या उपग्रहांवरील रिझोल्युशन इमेजिंग स्पेक्ट्रोरेडिओमीटरच्या माध्यमातून घेतलेल्या 20 वर्षांच्या माहिती संकलनाच्या अभ्यासानंतर ही निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत.