|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Top News » संसद परिसरात संशयित कार घुसल्याने धावपळ उडाली

संसद परिसरात संशयित कार घुसल्याने धावपळ उडाली 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सात वर्षांच्या चिमुकलीच्या हत्येप्रकरणी दिल्लीत बापलेकाला बेडय़ा ठोकण्यात आल्या आहेत. 21 वर्षांच्या तरुणाने चिमुकलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केला, तर मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनी पीडितेची हत्या केली. राजधनी दिल्लीतील निहाल विहारमध्ये हा भयावह प्रकार घडला.

  आरोपी राजेंद्रने सात वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केला होता. मुलाला पाठीशी घालण्यासाठी त्याचा 51 वषीय बाप रामशरणने पीडितेची गळा दाबून हत्या केली. पीडित चिमुकली बहिणीसोबत चायनीज पदार्थ आणण्यासाठी गेली होती. नशेच्या आहारी गेलेल्या आरोपीने त्यावेळी तिचे अपहरण केले. त्यानंतर राजेंद्रने तिच्यावर बलात्कार केला. आपल्या मुलाचा गुन्हा लपवण्यासाठी रामशरणने तिची गळा दाबून हत्या केली आणि ओळख पटू नये, यासाठी दगडाने तिचा मृतदेह ठेचला.