|Wednesday, February 20, 2019
You are here: Home » Top News » ट्रक अन् लक्झरी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात 3 ठार, 7 जखमी

ट्रक अन् लक्झरी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात 3 ठार, 7 जखमी 

ऑनलाईन टीम / जळगाव :

खाजगी आराम बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहनांच्या चालकासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, इतर सात जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी पहाटे दोन वाजता जळगावनजीक नशिराबाद येथील कपूर पेट्रोल पंपासमोर घडली. या अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजुकडील वाहतूक चार तास खोळंबली होती. तब्बल तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्रा ट्रव्हल्सची बस यवतमाळहून सुरतकडे तर ट्रक हा भावनगर (गुजरात) मधून अमरावतीकडे जात होता. मृतांमध्ये ट्रकचालक राजाराम गेनाराम चौधरी, निर्भयसिंग प्रतापसिंग कंवर व आराम बसचा चालक शंकर पटेल यांचा समावेश आहे. या अपघातात विनोद राठोड, राधा विनोद राठोड, पूजा विनोद राठोड, नारायण विनायक तांबोळे, गजानन चावके, संतोष अग्निहोत्री, ट्रव्हल्समधील वाहक अतिष पवार हे जखमी आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Related posts: