|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Top News » आजपासून आर्थिक मागासांना आरक्षण लागू

आजपासून आर्थिक मागासांना आरक्षण लागू 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आजपासून आर्थिक मागासांना आरक्षण लागू करण्यात आले आहे. फडणवीस सरकारने आर्थिक मागासांच्या 10 टक्के आरक्षणाचा अध्यादेश जारी केला आहे. केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाला 10 टक्के दिलेलं आरक्षण राज्यात लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. अखेर आज अध्यादेश काढून ते लागू करण्यात आले आहे.

  राज्य मंत्रिमंडळाने आर्थिकदृष्टय़ा मागासवर्गाला 10 टक्के आरक्षण देण्यास मंजुरी दिली होती. सवर्ण जातींमधील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकावर आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे या विधेयकाचे आता कायद्यात रूपांतर झाले. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर आता या आरक्षणाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून देशातील शिक्षणसंस्थांमध्ये खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण देण्यास सुरुवात होईल, अशी घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली होती.