|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Top News » पबजीसाठी त्याने बायकोसह कुटुंब सोडले!

पबजीसाठी त्याने बायकोसह कुटुंब सोडले! 

ऑनलाईन टीम / क्वालांलपूर :

जगभरात पबजी गेमने तरुणांना वेड लावले आहे. पबजी गेम खेळताना पत्नी आणि कुटुंबाचा अडथळा येतोय म्हणून एका तरुणाने चक्क चार महिन्याची गरोदर पत्नी आणि कुटुंबाला सोडल्याची धक्कादायक घटना मलेशियात उघडकीस आली आहे.

मलेशिया येथे एका तरुणाला पबजी खेळण्याचे व्यसन जडले होते. तो सतत पबजी गेम खेळायचा. पबजी गेम खेळत असताना कुणीही अडथळा आणू नये, असे तो वारंवार कुटुंबांतील व्यक्तींना सांगायचा. विवाहित असलेला हा तरुण कोणताही कामधंदा करीत नव्हता. त्याला पबजी खेळण्याचे व्यसन लागले होते. पजबीचा कोटा कोणत्याही अडथळाविना पूर्ण करता यावा यासाठी तो घरातून निघून गेला आहे. या तरुणाच्या पत्नीने फेसबुकवर एक पोस्ट टाकल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. महिलेनी मलाय भाषेत ही पोस्ट लिहिली असून पबजी गेम खेळण्यासाठी अडथळा नको म्हणून पती घर सोडून गेल्याचे पत्नीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ही महिला चार महिन्याची गरोदर आहे. पतीने पबजीसाठी घर सोडून आता एका महिना झाला आहे. चार वर्षापासून हा तरुण गेम खेळत होता. या तरुणाला पबजीचे व्यसन लागल्याने तो कोणतेही कामधंदा करीत नव्हता. पबजीच्या आधी तो ऑनलाइन गेम खेळत असल्याचेही त्याच्या पत्नीने सांगितले आहे.