|Thursday, June 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » लॉजिस्टीक क्षेत्रात लवकरच सरकारकडून नवीन योजना

लॉजिस्टीक क्षेत्रात लवकरच सरकारकडून नवीन योजना 

एकीकृत कार्यवाह योजना सरकार तयार करणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत सरकार लवकरच देशाच्या लॉजिस्टीक(पुरवठा) क्षेत्रात आमूलाग्र बदल करणार आहे. यातून एकसंध विकासात्मक योजना राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी दिली आहे.

देशातील व्यापार उद्योगाला गती प्राप्त व्हावी व त्यांच्या आधारे गुंतवणूक व व्यापारामध्ये एकसंधपणा तयार करत विकासाचा टप्पा गतीन वाढण्यासाठी प्रयत्न करण्यात सदर योजना तयार करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण यावेळी वाणिज्य मंत्रालयाकडून देण्यात आले आहे.

लॉजिस्टीक पोर्टलची लवकरच सुरुवात

येणाऱया दिवसांमध्ये वाणिज्य मंत्रालयाकडून भारतीय व्यापारासाठी ‘लॉजिस्टीक पोर्टल’चे व्यासपीठ सुरु करण्यात येणार आहे. या पोर्टलमुळे पुरवठा विभागात बळकटी तयार होणार असून भविष्यातील ध्येय धोरणे सुलभ करण्यासाठी उपयोगी पडणार असल्याचा विश्वास यावेळी संपादन करण्यात येणार असल्याचे वाणिज्यमंत्री प्रभू यांनी म्हटले.   

व्यापारी वर्गाला फायदा

नवीन योजना तयार करण्यात आल्यावर त्यामध्ये एक खिडकी योजनेमार्फत व्यापारी वर्गाला यांचा फायदा होणार असून मालाची देवाण घेवाण करण्यात येणाऱया व्यासपीठाचा सर्वाधिक उपयोग होणार आहे. गैरमार्गाने होणाऱया वापरावर आळा घालण्यासाठी सदर योजनेचा वापर केला जाणार आहे.