|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » उद्योग » टाटा कॅपिटलकडून टीआयए व्हॉइसबोटचे अनावरण

टाटा कॅपिटलकडून टीआयए व्हॉइसबोटचे अनावरण 

पुणे

टाटा कॅपिटलने व्यक्तिगत कर्जांसाठी टाटा कॅपिटलच्या मोबाइल ऍपमध्ये प्रथमच ‘टीआयए’ व्हॉइसबोटचे अनावरण केले आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे पाठबळ लाभलेले टीआयए हे ग्राहकांच्या व्यक्तिगत कर्ज (पर्सनल लोन) घेण्याच्या एकंदर प्रवासात ध्वनीच्या (व्हॉइस) स्वरूपामध्ये मदत करण्याच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आले आहे. ग्राहकाला कर्जासाठी पात्रता तपासून बघण्यापासून ते कर्जमंजुरीच्या संपूर्ण प्रक्रियेत काही मिनिटांमध्ये मदत उपलब्ध करून देण्यात हे सहाय्य करणार आहे. टाटा कॅपिटलच्या मुख्य मार्केटिंग व डिजिटल अधिकारी अबोंती बॅनर्जी म्हणाल्या, ग्राहकांना वैशिष्टय़पूर्ण सेवा देण्यासाठी कायम नवीन कल्पना आजमावत राहण्याचा टाटा कॅपिटलचा कायमच प्रयत्न असतो. एआय आर्थिक परिसंस्थेचा कायापालट होताना टीआयए ही अशा प्रकारची पहिलीच व्हॉइसबोट व्यक्तिगत कर्जांसाठी सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. संभाषणात्मक तंत्रज्ञान, विशेषत: व्हॉइस असिस्टन्सची भारतात वेगाने वाढ होत आहे. टीआयएच्या मदतीने या बदलाचा पाया कर्जमंजुरीच्या प्रक्रियेत घालून ग्राहकाचा अनुभव अधिक स्मार्ट व जलद करण्याचे लक्ष्य आमच्यापुढे आहे. आमची नवीन व्हॉइस असिस्टेड सेवा वापरण्यास सोपी आहे. त्याचप्रमाणे तिच्या कर्जमंजुरीचा प्रवास सुलभ करण्याच्या क्षमतेमुळे तिला वेगाने स्वीकृती मिळेल, असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो.