|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » देशांतर्गत कमजोर वातावरणाचा बाजाराला फटका

देशांतर्गत कमजोर वातावरणाचा बाजाराला फटका 

सेन्सेक्स 200 अंकाची घसरण , निफ्टीही कमजोर

वृत्तसंस्था/ मुंबई

देशांतर्गत बाजारात कमजोर संकेतामुळे मंगळवारी घसरणीची नोंद करण्यात आली. यामध्ये महागाई दरात घट झाल्याचा परिणाम बीएसईच्या सेन्सेक्सवर झाल्याचे पहावयास मिळाले असून त्यामुळे भारतीय बाजारात मंगळवारी 200 अंकाच्या घसरणीची नोंद करण्यात आली. दुसऱया बाजुला जागतिक संकेताक सकारात्मक राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.

जानेवारी महिन्याच्या तुलनेत खाद्य अंडी भाज्याचासह आदी उत्पादनाच्या किंमतीत 2.05 टक्के घट झालेली आहे. हा महागाई दर मागील 19 महिन्यातील सर्वात खालची पातळी गाठण्यात आली आहे. डिसेंबर 2018मध्ये किरकोळ महागाई निर्देशांक यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीत 2.11 इतक्या महागाई दराची नोंद करण्यात आली होती.

दिवसभरातील भारतीय बाजारात सुरुवातील सकारात्मक झाली होती. त्यामुळे दरम्यानच्या काळात 36,465.40 निर्देशांक राहिला होता. तसेच काहीसे वातावरण  आशिया मार्केटमध्ये राहिल्याचे नोंदवण्यात आले. परंतु किरकोळ महागाई निर्देशांक यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीमुळे बीएसई निर्देशांक 241.41 अंकानी घसरण होत 36,153.62 बंद झाला. एनएसई निफ्टीचा निर्देशांक 57.40 अंकानी घसरत जात 10,823.80 बंद झाला.

दिग्गज कंपन्यांमध्ये हीरोमोटो कॉर्प, एचडीएफसी, स्टेट बँक, इन्फोसिस, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, ओन्जस, बजाज ऑटो आणि इंडसइंड बँक यांचे निर्देशांक 2.63 अंकानी कमजोर होत बंद झालेत. आणि सन फार्मा, कोल इंडिया, टाटा स्टील, एनटीपीसी, एशियन पेन्टस, वेदान्ता, महिंद्रा ऍण्ड महिंदा आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या निर्देशांकात 2 टक्क्यांनी तेजीची नोंद करण्यात आली.