|Thursday, June 20, 2019
You are here: Home » क्रिडा » टी-20 मानांकनात जेमिमा रॉड्रीग्ज दुसऱया स्थानी

टी-20 मानांकनात जेमिमा रॉड्रीग्ज दुसऱया स्थानी 

वृत्तसंस्था / दुबई

आयसीसीच्या महिलांच्या टी-20 फलंदाजांच्या मानांकन यादीत भारताची महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जने दुसऱया स्थानावर झेप घेतली असून स्मृती मंदाना सहाव्या स्थानावर आहे.

आयसीसीच्या महिला टी-20 ताजी मानांकन यादी नुकतीच घोषित करण्यात आली. भारतीय महिला क्रिकेट संघाला न्यूझीलंडमध्ये टी-20 मालिका 0-3 अशी एकतर्फी गमवावी लागली होती. या मालिकेत रॉड्रिग्जने 3 सामान्यात 132 धावा जमविल्याने तिच्या स्थानामध्ये चार अंकानी सुधारणा झाली आणि ती आता दुसऱया स्थानावर आहे. गेल्या आठवडय़ात आयसीसीच्या महिलांच्या वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत पहिल्या स्थानावर असलेल्या स्मृती मंदानाने टी-20 मानांकनात सहावे स्थान मिळविले आहे. तिचे स्थान चार अंकानी घसरले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत मंदानाने 180 धावा जमवल्या असून त्यामध्ये दोन अर्ध शतकांचा समावेश आहे. टी-20 महिला गोलंदाजांच्या यादीत भारताची फिरकी गोलंदाज राधा यादवने दहावे स्थान मिळविले आहे. न्यूझीलंडची डिव्हाईन फलंदाजांच्या यादीत आठव्या स्थानावर आहे. यष्टपैलूंच्या यादीत विंडिजची डॉटीन पहिल्या स्थानावर आहे. फलंदाजांच्या यादीत डॉटीन तिसऱया स्थानावर आहे. महिला विभागातील टी-20 सांघिक मानांकनात ऑस्ट्रेलिया पहिल्या, न्यूझीलंड दुसऱया, इंग्लंड तिसऱया, भारत चौथ्या आणि विंडिज पाचव्या स्थानावर आहेत.