|Thursday, August 22, 2019
You are here: Home » क्रिडा » माँटे कार्लो स्पर्धेतून फेडररची माघार

माँटे कार्लो स्पर्धेतून फेडररची माघार 

वृत्तसंस्था / माँटे कार्लो

13 एप्रिलपासून येथे होणाऱया एटीपी टूरवरील माँटे कार्लो पुरुषांच्या टेनिस स्पर्धेतून स्वीत्झर्लंडच्या 37 वर्षीय रॉजर फेडररने माघार घेतल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन गँडस्लॅम स्पर्धेत चौथ्या फेरीत फेडररला पराभव पत्करावा लागला होता. चालू वर्षीच्या टेनिस हंगामातील क्लेकोर्टवर होणाऱया स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय फेडररने घेतला आहे. येत्या जुलैमध्ये होणाऱया ग्रासकोर्टवरील विंबल्डन स्पर्धेसाठी जोरदार सराव करण्याच्या हेतूने हा निर्णय घेतल्याचे फेडररने सांगितले. आगामी माद्रीद आणि इटालीयन खुल्या क्लेकोर्टवरील स्पर्धेत फेडरर कदाचित सहभागी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.