|Thursday, August 22, 2019
You are here: Home » क्रिडा » स्वीत्झर्लंडच्या वावरिंकाची विजयी सलामी

स्वीत्झर्लंडच्या वावरिंकाची विजयी सलामी 

वृत्तसंस्था / रोटरडॅम

एटीपी टूरवरील येथे सुरू झालेल्या रोटरडॅम खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत स्वीत्झर्लंडच्या 33 वर्षीय स्टॅनिसलास वावरिंकाने एकेरीत विजयी सलामी देताना बेनोई पेरीचा पराभव केला.

पहिल्या फेरीतील सामन्यात वावरिंकाने फ्रान्सच्या पेरीचा 7-6 (7-4), 6-1 असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. वावरिंकाने हा सामना 85 मिनिटात जिंकला. पहिल्या फेरीतील अन्य सामन्यामध्ये इटलीच्या सिप्पीने जर्मनीच्या गोजोविजेकचा 7-6 (7-3), 3-6, 6-2, कझाकस्थानच्या कुकूसिखीनने हॉलंडच्या रॉबिन हॅसचा 6-2, 7-6 (7-4) असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला.