|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » स्वाभिमानीने हरळीजवळ ऊस वाहतूक रोखली

स्वाभिमानीने हरळीजवळ ऊस वाहतूक रोखली 

प्रतिनिधी/ गडहिंग्लज

आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी कारखान्याने चालू वर्षीच्या हंगामाचे 42 दिवस होवून सुध्दा एफआरपीची रक्कम व थकीत रक्कम अद्याप †िदली नसल्याने हरळी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्डय्याण्णावर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील ऊस वाहतुक रोखण्यात आली. ऊस वाहतूक रोखल्याने रस्त्याच्या दुतर्फा ऊस वाहतूक करणारी वाहने थांबून होती. या वाहनांच्या रांगा लांबपर्यंत लागल्या होत्या. दुपारी 2 ते सायंकाळी 5 अशी सुमारे तीन तास वाहतूक रोखण्यात आली होती. सायंकाळी गडहिंग्लज कारखाना चालविणाऱया ब्रिस्क फॅसिलीटीज या कंपनीचे जनरल मॅनेजर श्री. गुजर यांनी उपलब्धतेनुसार रक्कम अदा करण्याचे लेखी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

चालू वर्षी कारखाने चालू होवून तीन महिने झाले असून गडहिंग्लज कारखान्याने गतवर्षीच्या बिलातील 335 रू. दिले नसून, चालू वर्षीची उचलही दिलेली नाही. ऊस गळीतास जाऊन तीन महिने उलटले तरी शेतकऱयांना अद्याप बिले मिळाले नाहीत यासाठी वारंवार कारखान्याला व ब्रिक्स कंपनीला निवेदन देवून बिले अदा करण्याची मागणी केली होती. पण या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस वाहतूक रोखली. सायंकाळी कारखाना प्रशासनाशी चर्चा करण्यात आल्यानंतर जनरल मॅनेजर श्री. गुजर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गडय़ान्नावर यांच्याकडे लेखी पत्र दिले. या पत्रात, ब्रिस्क कंपनीने 2017-18 च्या गळीत हंगामातील गाळप झालेल्या उसाची संपूर्ण एफआरपी 2565 रू. 10 पैसे प्रती मेट्रीक टन अदा केली आहे. या व्यतिरिक्त जादा 100 रू. प्रतीटन प्रमाणे ऊसबील अदा केले आहे. मागणीप्रमाणे उर्वरीत 100 रू. प्रमाणे होणारी रक्कम उपलब्धतेनुसार अदा करणेची व्यवस्था करत आहोत. तर सन 2018ö19 मध्ये गळीतास येणाऱया ऊसासही आजरा कारखान्याच्या ऊस दराप्रमो ऊस दर अदा करण्यात येईल, असे म्हटले आहे.

यावेळी सुभाष पाटील, बसवराज मुत्नाळे, धनाजी पाटील, मलाप्पा आमाते, राजशेखर कित्तुरकर, सागर ग्वाडी, विजय पाटील, राजकुमार पाटील, भीमराव शिंदे, सचिन टोळी, शिवानंद हुक्केरी, सदाशिव चौथे, मारूती बंदी, ज्ञानदेव पताडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.