|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ट्रकच्या धडकेमध्ये चिमुरडीचा मृत्यू

ट्रकच्या धडकेमध्ये चिमुरडीचा मृत्यू 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

तालुक्यातील वेतोशी-धनगरवाडी येथे चिरेखाणीजवळ ट्रकच्या धडकेत 2 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडल़ी सृष्टी शिवानंद चव्हाण (वय 2, ऱा वेतोशी, मूळ विजापूर) असे या मृत मुलीचे नाव आहे. या घटनेची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आह़े

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सृष्टी चव्हाण हिचे वडील वेतोशी धनगरवाडी येथील चिरेखाणीवर कामाला आहेत़ यावेळी मंगळवारी सकाळी सृष्टी ही चिरेखाणीजवळ खेळत असताना त्या ठिकाणाहून जाणाऱया ट्रकची तिला जोरदार धडक बसल़ी या प्रकरणी ट्रक चालक योगेश श्रीधर सुर्वे (40, ऱा मुरूगवाडा, रत्नागिरी) याची चौकशी करण्यात येत असून पुढील तपास करण्यात येत आह़े