|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » महाराष्ट्र केसरीपेक्षा हिंद केसरी व्हायला आवडेल : जानकर

महाराष्ट्र केसरीपेक्षा हिंद केसरी व्हायला आवडेल : जानकर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भाजपाने जागा सोडल्यास शरद पवारांविरोधात निवडणूक लढवायला तयार असल्याचे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दंड थोपटले आहेत. महाराष्ट्र केसरी होण्यापेक्षा हिंद केसरी व्हायला मला जास्त आवडेल, अशा शब्दांमध्ये जानकरांनी पवार यांना थेट आव्हान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची दाट शक्मयता आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून सुप्रिया सुळेंना आव्हान देणाऱया जानकर यांनी आता शरद पवारांविरोधात निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचे म्हटले. ‘मी बारामती आणि माढामधून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दिला आहे. बारामतीत यंदा कमळ फुलेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मात्र पाच मिनिटांच्या मुलाखतीत हा मतदारसंघ मिळू. ते आमचे म्हणणे ऐकतील याची खात्री आहे,’ असंदेखील जानकर म्हणाले. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडे सहा जागांची मागणी करणार असल्याचे जानकर यांनी सांगितले. गेल्या लोकसभा निवडणुकीत जानकर यांनी बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना कडवी टक्कर दिली होती. जानकर यांनी भाजपाच्या चिन्हावर ही निवडणूक लढवावी, असा आग्रह त्यावेळी भाजपाकडून करण्यात आला होता. मात्र जानकर यांनी रासपच्या कपबशी या चिन्हावर निवडणूक लढवली. मतमोजणीच्या सुरुवातीच्या काही फेऱयांमध्ये ते आघाडीवरदेखील होते. मात्र त्यानंतर सुळेंनी बाजी मारली. माढा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात काँग्रेसच्या बाजूने वातावरण असताना शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी शरद पवार सोशलिस्ट काँग्रेसकडून रिंगणात होते. मात्र सहानभूतीची लाट असूनही काँग्रेसला हा मतदारसंघ जिंकता आला नव्हता. आताही हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच आहे. विजयसिंह मोहिते-पाटील या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.