|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » Top News » 12वी पास व्यक्ती पुन्हा पंतप्रधानपदी नकोच : अरविंद केजरीवाल

12वी पास व्यक्ती पुन्हा पंतप्रधानपदी नकोच : अरविंद केजरीवाल 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

2014 मधील लोकसभा निवडणुकीत जनतेने 12 वी पास व्यक्तीला पंतप्रधनपदी बसवले. आता 2019 मधील निवडणुकीत जनतेने ही चूक सुधरावी. आता एखाद्या सुशिक्षित व्यक्तीला पंतप्रधनपदी संधी द्यावी, अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधन नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

  दिल्लीत बुधवारी अरविंद केजरीवाल यांनी विरोधकांच्या सभेतून भाजपा आणि मोदींवर टीकास्त्र सोडले. केजरीवाल यांनी मोदींच्या शैक्षणिक पात्रतेवरही प्रश्न उपस्थित केले. केजरीवाल म्हणाले, गेल्यावेळी तुम्ही 12 वी पास व्यक्तीला पंतप्रधनपदी बसवले. यंदा या चुकीची पुनरावृत्ती करु नका. यावेळी एखाद्या सुशिक्षित व्यक्तीला पंतप्रधनपदी संधी द्या. पंतप्रधनपद अत्यंत महत्त्वाचे पद आहे. 12 वी पास व्यक्तीला हस्ताक्षर कुठे करायचे हेच समजत नाही, असे त्यांनी सांगितले. दिल्लीत पार पडलेल्या या सभेत ममता बॅनर्जी, शरद पवार, चंद्राबाबू नायडू आदी नेते उपस्थित होते. केजरीवाल पुढे म्हणाले, 14 एप्रिल 2011 रोजी जंतर मंतरवरील ऐतिहासिक भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर देशातील जनतेने तत्कालीन यूपीए सरकारला सत्तेतून हटवले होते. त्याच पद्धतीने आता या सभेनंतर जनता मोदी सरकारला उखाडून फेकणार, असे त्यांनी सांगितले.