|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » Top News » मेकअप टिकत नसल्याने नवविवाहितेची आत्महत्या

मेकअप टिकत नसल्याने नवविवाहितेची आत्महत्या 

ऑनलाईन टीम / नाशिक :

मेकअप टिकत नसल्याने नाशिकमध्ये एका महिलेनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. नाशिकच्या अंबडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. आत्महत्या करणारी महिला नवविवाहित असल्याची माहिती मिळते आहे.

 

नाशिकच्या अंबडमधील दत्तनगर भागात एका महिलेने आत्महत्या केली. नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन महिलेने जीवन संपवले. या महिलेच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. ’माझ्या डोळय़ातून सतत पाणी येतं. त्यामुळे डोळय़ांना काजळ लावता येत नाही. याशिवाय चेहऱयावर मेक अपदेखील टिकत नाही’, असा मजकूर या चिठ्ठीत आहे. हा मजकूर पाहून अनेकांना धक्का बसला. आत्महत्या केलेल्या महिलेचा विवाह काही दिवसांपूर्वीच झाला होता. त्यामुळे या आत्महत्येमागे इतर काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.