|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘अरुणा’ प्रकल्पाचे काम पोलीस बंदोबस्तात

‘अरुणा’ प्रकल्पाचे काम पोलीस बंदोबस्तात 

वार्ताहर / वैभववाडी:

आखवणे-भोम येथे अरुणा पाटबंधारे प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रकल्पग्रस्तांना अंधारात ठेवून व प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या असताना शासन व ठेकेदाराने बळाच्या जोरावर प्रकल्पाचे काम सुरू ठेवल्याचा आरोप सिंधुदुर्ग युवक स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी करून तेथील कार्यालयाला टाळे ठोकून गुरुवारी काम बंद पाडले होते. दरम्यान, शुक्रवारी प्रशासनाने पोलीस बंदोबस्त मागवून हे काम पुन्हा सुरू केले.

दरम्यान, काम बंद आंदोलन करणाऱयांविरुद्ध कोणतीही तक्रार पोलिसांत नाही, तर दुसरीकडे प्रकल्पग्रस्तांना या आंदोलनाबाबत कोणतीच माहिती नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी मैदानात उतरलेल्या स्वाभिमान पक्षाची नेमकी भूमिका काय आहे, असा प्रश्न उपस्थित झाला होता. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजन डवरी म्हणाले, अरुणा पाटबंधारे प्रकल्पाचे काम प्रधानमंत्री जलसिंचन योजनेत समाविष्ट असून यावर्षी पहिल्या टप्प्याचे घळभरणीचे काम पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. प्रकल्पग्रस्तांना लवकरच भूखंड देऊन त्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता प्रशासन घेत आहे.

Related posts: