|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » भुईबावडा घाटात अनोळखी वृद्धाचा मृतदेह

भुईबावडा घाटात अनोळखी वृद्धाचा मृतदेह 

वार्ताहर / वैभववाडी:

भुईबावडा घाटातील रस्त्यानजीकच्या गटारात अंदाजे 70 वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सापडला आहे. घटनेची नोंद वैभववाडी पोलिसांत करण्यात आली आहे. घटनेची माहिती तिरवडे तर्फ खारेपाटणचे पोलीस पाटील प्रल्हाद पावले यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे, उपनिरीक्षक जयश्री भोमकर, भुईबावडा दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक वरवडेकर, शिपाई मारुती साखरे, पोलीस नाईक वाय. व्ही. तांडेल यांनी पंचनामा केला. शवविच्छेदन उंबर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. मृतदेह कणकवली येथील शवागरात ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related posts: