|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बिबटय़ाच्या हल्ल्यात जखमीवर तब्बल 64 टाके

बिबटय़ाच्या हल्ल्यात जखमीवर तब्बल 64 टाके 

प्रतिनिधी / दोडामार्ग:

 परमे गावात हाहाकार उडविणाऱया बिबटय़ाच्या हल्ल्यातील जखमी वृद्ध नारायण बाबुराव धुरी (75) यांना उपचारासाठी गोवा येथे हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या शरीरावर एवढय़ा जखमा होत्या की त्यांना 64 टाके घालावे लागले, अशी माहिती सरपंच आनंद नाईक यांनी दिली.

 धुरी हे आपला चरीतार्थ मोलमजुरी करून चालवितात. यापुढे त्यांना मजुरी करणे शक्य नसून त्यांना केवळ उपचारासाठीच नव्हे, तर जगण्यासाठी आर्थिक साहय़ दिले पाहिजे. ते जर वनविभाग देऊ शकला नाही, तर जनआंदोलन उभारू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 परमे गावात गुरुवारी पहाटे तब्बल पाच घरात घुसून बिबटय़ाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. यात तिघेजण जखमी झाले होते. यातील दोघांवर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले, तर नारायण धुरी यांना बांबोळी येथे हलविण्यात आले. दरम्यान, बिबटय़ाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप तरी समजू शकले नाही. शवविच्छेदन अहवाल शुक्रवारी सायंकाळपर्यत आला नव्हता, अशी माहिती दोडामार्गचे वनक्षेत्रपाल अशोक गमरे यांनी दिली. बिबटय़ाचा मृत्यू हा वनविभागाच्याच हलगर्जीपणामूळे झाला असल्याचे नाईक यांचे म्हणणे आहे.

Related posts: