|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » काकतीवेस येथे सिलिंडर स्फोटांमुळे इमारतीला आग

काकतीवेस येथे सिलिंडर स्फोटांमुळे इमारतीला आग 

प्रतिनिधी / बेळगाव

एसी, फ्रिज दुरुस्ती दुकानात झालेले शॉर्टसर्किट आणि त्यानंतर झालेल्या सिलिंडर स्फोटांमुळे शुक्रवारी सायंकाळी काही भागात घबराट पसरली होती. काकतीवेस येथील माडीवाले प्लाझामध्ये घडलेल्या या घटनेनंतर धूर आणि आगीचे लोळ उठले होते. कानठळय़ा बसविणाऱया स्फोटांच्या आवाजामुळे बाजारपेठेत एकच धावपळ उडाली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र इमारतीत अडकलेल्या चौघा जणांना वाचविण्यात यश आले आहे.

शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा, मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी, खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धिरज शिंदे, मार्केटचे पोलीस निरीक्षक विजय मुरगुंडी, टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक मौनेश देशनूर आदी वरि÷ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या आगीत मोठी हानी झाली असून त्याचा नेमका आकडा रात्री उशीरापर्यंत समजू शकला नाही.

काकतीवेसवर जमलेल्या गर्दीमुळे मदतकार्यात अडथळे निर्माण झाले होते. पोलिसांनी गर्दी हटवून स्थानिक कार्यकर्ते व अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यासाठी वाट मोकळी करुन दिली. स्थानिक कार्यकर्त्यांनीही मोठय़ा धाडसाने या इमारतीत घुसून आग विझविण्याच्या कामात जवानांना मदत केली तर तिसऱया मजल्यावर असलेल्या दोन मुलींसह चौघा जणांना खिडकीचे ग्रील काढून सुखरुप बाहेर काढण्यात आले.

माडीवाले प्लाझामध्ये असलेल्या लक्ष्मी रेफ्रिजेशन या दुकानात झालेल्या शॉर्टसर्किटनंतर झालेल्या सिलिंडर स्फोटामुळे संपूर्ण इमारतीला आग लागली होती. या इमारतीत मोबाईल दुकान, श्री साई डायग्नोस्टिक सेंटर, दवाखाने आदींसह अनेक आस्थापने आहेत. तीन मजली इमारतीत तळमजल्यावर असलेल्या लक्ष्मी

रेफ्रिजेशनमध्ये सावरबल चौधरी हा कामगार 5.30 वाजण्याच्या सुमारास काम करीत होता. या दुकानात एसी, फ्रिज दुरुस्ती केली जाते. एसी व फ्रिज दुरुस्तीसाठी लागणाऱया सिलिंडरचा साठा या दुकानात होता. दुरुस्ती सुरू असताना शॉर्टसर्किट होऊन आग लागली. त्यानंतर एका पाठोपाठ एक असे एकूण 6 ते 8 सिलिंडरांचा स्फोट होऊन कानठळय़ा बसविणारा आवाज आला. आवाजापाठोपाठ या इमारतीतून धूर आणि आगीचे लोळ बाहेर पडत होते. त्यामुळे जीवाच्या आकांताने या इमारतीतील अनेक जण धावत सुटले.

तातडीने अग्निशमनदलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमनदल अधिकारी व्ही. एस. टक्केकर यांच्या नेतृत्वाखाली दोन बंब दाखल झाले. तळ मजल्यावर लागलेल्या आगीमुळे तिसऱया मजल्यापर्यंतच्या आस्थापनात प्रचंड धूर शिरला होता. त्यामुळे दुसऱया व तिसऱया मजल्यावरील लोकांना त्याचा त्रास होत होता. खिडकीतून ते बाहेर हाका मारत होते. आम्हाला वाचवा असे आकांताने ओरडत होते.

स्थानिक कार्यकर्ते व जवानांनी खिडक्मयांच्या काचा फोडून त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला. इमारतीच्या पाठीमागच्या बाजूचे ग्रील काढून दोन तरुणींसह चौघा जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. धुरामुळे त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे तातडीने त्यांना रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

चौकट करणे

चौघा जणांवर उपचार

तिसऱया मजल्यावर कॅड इंजिनिअर्स अकादमी आहे. येथे संगणक प्रशिक्षणासाठी आलेल्या सुजाता बाळेश चंदरगी (वय 21, मूळची रा. एम. के. हुबळी, सध्या रा. आझमनगर), अपूर्वा विरुपाक्ष अगसगी (वय 21, मूळची रा. पारिश्वाड, सध्या रा. सुभाषनगर), सिद्धेश्वर शेट्टर (वय 23, रा. कित्तूर) या तिघा जणांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याच इमारतीत धुरामुळे त्रास झालेल्या शाहबाज कलईगार (वय 28, रा. फोर्टरोड) या तरुणालाही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

चौकट करणे

 प्रचंड आवाज

फ्रिज, एसी दुरुस्तीसाठी लागणाऱया सिलिंडरचा साठा या दुकानात होता. एका पाठोपाठ एक सिलिंडर स्फोट झाल्यामुळे प्रचंड आवाज आला. त्यामुळे आवाजाच्या दिशेने अनेक जण धावून आले. सुरुवातीला हा स्फोट कसला याची कोणालाच कल्पना नव्हती. नंतर त्या इमारतीतून धूर आणि आगीचे लोळ उठले. या घटनेनंतर सावरबल व त्याचे साथीदार जीवाच्या आकांताने दुकानातून बाहेर पडले. तोही किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. रात्री उशीरापर्यंत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती. या आगीत मोठी हानी झाली असली तरी नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नाही.

Related posts: