|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » बारावीच्या 15 लाख विद्यार्थ्यांचे काय होणार ? : शिक्षक असहकाराच्या पवित्र्यात

बारावीच्या 15 लाख विद्यार्थ्यांचे काय होणार ? : शिक्षक असहकाराच्या पवित्र्यात 

ऑनलाईन टीम / मुंबई :

येत्या 20 फेब्रुवारीपर्यंत आश्वासनाची पूर्तता न झाल्यास 21 फेब्रुवारीपासून “असहकार आंदोलन ’’ करण्यात येईल. यात बारावीला बसलेल्या 15 लाख विद्यार्थ्यांचे नुकसान झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाचीच असेल असा इशारा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा.अनिल देशमुख यांनी दिला आहे.

   माहिती तंत्रज्ञान विषयास अनुदान देणे, 24 वर्षांच्या सेवेनंतर सर्व शिक्षकांना निवड श्रेणी लागू करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकांनाही राज्य सरकारी कर्मचाऱयांप्रमाणे 10 ,20 व 30 वर्षांच्या सेवेनंतर अश्वसित प्रगती योजना लागू करणे, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून तातडीने आयोगाच्या शिफारशी लागू करणे या मागण्या शिक्षकांच्या होत्या. या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कनि÷ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने राज्यभरात मूक मोर्चे काढले. त्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासोबत 31 जानेवारी बैठक झाली. त्यात शिक्षकांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. या बैठकीत शासनादेश दहा दिवसांत काढण्याचे आश्वासन शिक्षकांना देण्यात आले. अर्थमंत्र्यांसमवेत संयुक्त बैठक घेऊन त्यांच्याशी संबधित मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याचेही ठरले होते.