|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Top News » ‘सामना’चा गळा लता मंगेशकरपेक्षाही गोड : धनंजय मुंडे

‘सामना’चा गळा लता मंगेशकरपेक्षाही गोड : धनंजय मुंडे 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधन परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपा-शिवसेना युतीवरून ‘सामना’त प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखाचा दाखला देत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. “सामना’’मधील आजचा अग्रलेख लता मंगेशकर यांच्या आवाजापेक्षाही गोड आहे, वाचलात का, असा उपरोधिक सवाल मुंडे यांनी विचारला आहे. तलवार म्यानबंद नाही वारा आमच्या दिशेने वळला या मथळय़ाखाली “सामना’’मध्ये अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. त्याचा समाचार मुंडे यांनी घेतला आहे.

    सोमवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांनी लोकसभा, विधनसभा निवडणुकीसाठी युती जाहीर केली. त्यानंतर विरोधी पक्षांसह सोशल मीडियावर युतीवर मोठय़ा प्रमाणात टीका करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपाबरोबर युती करणार नाही अशी वारंवार भीमगर्जना करणारे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांच्या त्या त्या वेळच्या वक्तव्याचा दाखल दिला जात आहे. शिवसेनेने ‘सामना’तून युतीवर टीका करणाऱयांचा समाचार घेतला आहे. जनतेच्या मनात कमी, पण आमच्या राजकीय विरोधकांच्या डोक्मयात प्रश्नांचे किडे जरा जास्तच वळवळत आहेत. ‘युती’मुळे हे किडेमकोडे साफ चिरडले जातील या भीतीतून त्यांची वळवळ सुरू झाली असल्याचा टोला लगावला होता. याच अग्रलेखाचा आधर घेत धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

Related posts: