|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Top News » एमएमआरडीएचे क्षेत्र विस्तारले , वसई ते पेणपर्यंत वाढले

एमएमआरडीएचे क्षेत्र विस्तारले , वसई ते पेणपर्यंत वाढले 

ऑनलाईन टीम / मुंबई :

एमएमआरडीएचे क्षेत्र विस्तारण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. यामुळे पालघर, वसई ते पेणपर्यंतचा भाग एमएमआरडीएच्या अधिकारात येणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिकांमधून जाणारे रस्ते कोणी करायचे, विकासकामे कोणी करायची यावरून कामे रखडत होती. याचा परिणाम विकासावर होत होता. यामुळे एमएमआरडीएचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे एमएमआरडीएमध्ये पालघरमधील वसई तालुका, रायगडमधील अलिबाग, पेण, खालापूर, पनवेल तालुके एमएमआरडीएच्या क्षेत्रात येणार आहेत. एमएमआरडीएचे आयुक्त प्रवीण दराडे यांनी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर सोनिया सेठी यांची एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

Related posts: