|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Top News » दहशतवादाविरोधात भारताला पूर्ण सहकार्य करणार :सौदी

दहशतवादाविरोधात भारताला पूर्ण सहकार्य करणार :सौदी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला जगभरातून पाठिंबा मिळत असताना सौदी अरेबियानंही भारताला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. ‘दहशतवाद हा सर्वांसाठीच चिंतेचा विषय आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी आम्ही भारताला सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहोत,’ असे आश्वासन सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी आज दिले.

 

मोहम्मद बिन सलमान सध्या भारताच्या दौऱयावर आहेत. राजधनी दिल्लीत पंतप्रधन मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सलमान यांनी दहशतवादाच्या मुद्दयावर भाष्य केले. ‘कट्टरतावाद व दहशतवादासारख्या मुद्यावर आम्ही भारताच्या सोबत आहोत. इंटेलिजन्ससह अन्य सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची आमची तयारी आहे,’ असे सलमान म्हणाले. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा थेट उल्लेख मात्र त्यांनी टाळला.

 

भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेला पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी सलमान यांचे आभार मानले. ‘दहशतवाद पोसणाऱया देशांवर दबाव वाढवणं गरजेचं आहे. दहशतवादी विचारांमुळे तरुण भरकटू नयेत यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. या मुद्यावर सौदीचे विचार आमच्याशी जुळतात याचा आनंद आहे. दहशतवादविरोध, सागरी व सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत दोन्ही देशांत सहमती झाली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

Related posts: