|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Top News » इम्रान खानला संधी द्यायला हवी : मेहबूबा मुफ्ती

इम्रान खानला संधी द्यायला हवी : मेहबूबा मुफ्ती 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

भारताने पाकिस्तानला पठाणकोट दहशतवादी हल्ला, तसेच मुंबई दहशतवादी हल्ल्याचे पुरावे दिले असतानाही त्या देशाने काहीही कारवाई केली नाही हे खरे आहे, मात्र असे असले तरी इम्रान खान हे नवे पंतप्रधन असल्याने त्यांना संधी देणे गरजेचे आहे, असे मत जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री,पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना मुफ्ती यांनी पुलवामा हल्ल्यावर भाष्य करताना हे मत मांडले आहे.

 मुफ्ती म्हणाल्या की, पूर्वीच्या पाकिस्तानपेक्षा आताचा पाकिस्तान वेगळा असल्याचे इम्रान खान सांगत आहेत. हा नवा पाकिस्तान असल्याचे सांगत विकासाच्या मुद्यावर त्यांना भर द्यायचा आहे. अशा स्थितीत इम्रान खान यांना संधी द्यायला हवी. आपण त्यांना पुलवामा हल्ल्याचे पुरावे दिले पाहिजेत, त्यावर ते काय करतात हे पाहणे गरजेचे आहे.

 

Related posts: