|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » क्रिडा » आता युद्ध झालेच पाहिजे : युजवेंद्र चहल

आता युद्ध झालेच पाहिजे : युजवेंद्र चहल 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

आता आपण गप्प बसून चालणार नाही. पाकिस्तानने भारताच्या सहनशक्तीचा अंत पाहिला असून आता पाकिस्तानशी युद्ध व्हायलाच हवे असे मत यजुवेंद्र चहल याने व्यक्त केले आहे. तसेच पाकिस्तानविरोधत सामना खेळायचा की नाही हा निर्णय भारत सरकार घेईल असेही त्याने सांगितले आहे.

 

28 वर्षाच्या यजुवेंद्र चहलची नुकतीच एका मोठय़ा वृत्तसमुहाने मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत त्याला पुलवामा हल्ल्याबद्दल प्रश्न विचारला असता तो म्हणाला, ‘या प्रकरणाचा एकदाचा निकाल लागायलाच हवा. आम्ही जास्त सहन करु शकत नाही. दर तीन महिन्यांनी जवान शहीद होत असल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. भारत आणि पाकिस्तानमध्ये आता निर्णायक लढा व्हायलाच हवा. त्याशिवाय पाकिस्तान सरळ होणार नाही.’ विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तानविरोधत सामना खेळेल का असे विचारल असता हा निर्णय बीसीसीआय आणि केंद्र सरकार घेईल असेही त्याने सांगितले आहे.

 

Related posts: