|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Top News » विदर्भ आणि मराठवाड्याला गारपिटीचा फटका, अकोला, जालना, बुलडाण्यात नुकसान

विदर्भ आणि मराठवाड्याला गारपिटीचा फटका, अकोला, जालना, बुलडाण्यात नुकसान 

ऑनलाईन टीम /  मुंबई :

 विदर्भ आणि मराठवाड्याला वादळी पाऊस आणि गारपिटीचा चांगलाच फटका बसला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे 20 आणि 21 फेब्रुवारीला काही भागात वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता.

जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि घनसांगवी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. भोकरदन तालुक्यातल्या पारध, रेणुकाई पिंपळगाव गावात रात्रीच्या सुमारास गारा पडल्या. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंतेचे  वातावरण आहे. बुलडाणा जिल्ह्यालाही अवकाळी पावसाने  झोडपले आहे. गारपिटीने  गहू आणि हरभऱ्याबरोबरच मोसंबीच्या पिकाचे  मोथे  नुकसान होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून जालना जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे  फळबागांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.अमरावती शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात रात्री अवकाळी पाऊस पडला. कालपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळेकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन आणि घनसांगवी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंतेचे  आहे.   गारपिटीने गहू आणि हरभऱ्याबरोबरच मोसंबीच्या पिकाचे  मोठे  नुकसान होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून जालना जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे  बागांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related posts: