|Sunday, August 25, 2019
You are here: Home » उद्योग » औषध धातूच्या कामगिरीने बाजारात तेजी

औषध धातूच्या कामगिरीने बाजारात तेजी 

वृत्तसंस्था /मुंबई :

सलग दुसऱया दिवशी भारतीय शेअर बाजारात (बीएसई) तेजीची नोंद करण्यात आली आहे. प्रामुख्याने बाजारात धातू, औषध आणि बँकिग यांच्या सकारात्मक कामगिरीने निर्देशांकात तेजी नोंदवण्यात आली. सेन्सेक्समध्ये 142 अंकानी दिवसभरात तेजी झाली. विदेशी आणि देशांतर्गत असणाऱया गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीचा ही परिणाम बाजारात झाल्याचे पहावयास मिळाले.

दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्सने 142 अंकानी उसळी घेत 35,898.35 बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराने 54.40 अंकानी तेजी नोंदवत 10,789.85 वर बंद झाला. महत्वाच्या कंपन्यांमध्ये टाटा मोटर्सचा निर्देशांक 2.94 अंकानी वरती गेला. तर वेदान्ता, बजाज फायनान्स , सन फार्मा, ओन्जस , आयसीआयसीआय बँक, बजाज ऑटो, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, लार्सन ऍण्ड टुब्रो आणि स्टेट बँक यांच्या निर्देशांकाने 2.78 ने तेजीची कामगिरी केली आहे. तर येस बँक, कोल इंडिया, इन्फोसिस. इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा ऍक्सिस बँक, आयटीसी आणि टीसीएस यांच्या निर्देशांक 1.33 ची घसरण झाली.

सलगची दुसऱया दिवशीच्या तेजीने शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण राहिले यात बीएसईचा मिडकॅप 0.88 टक्के आणि स्मॉलकॅपने 1.07 टक्क्यांनी समाधानकारक कामगिरी पार पाडली. वित्त मंत्रालयाकडून बुधवारी करण्यात आलेल्या घोषणेतून 48 हजार 239 कोटीचे  सरकारी बँकांना अर्थसाहाय्यामुळे 12 बँकांची आगामी काळात वित्तीय स्थितीत सुधारणा  होणार असल्याची मते तज्ञांकडून माडली जात आहेत. कारण या  आर्थिक लाभामुळे काही बँकां पीसीएसच्या यादीत समावेश असणाऱया आहेत त्यांना यातून आगामी काळात मोठा दिलासा मिळणार असल्याचे पहावयास मिळत आहे.

सध्याचा तेजीचा शेअर बाजाराचा प्रवास आगामी काळात राहण्यासाठी देशातील राजकीय वातावरणाच्या प्रभावावर निश्चित होणार असल्याची मते अभ्यासकांनी नमूद केली आहेत.