|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » खर्च न केल्याने जिल्हा परिषदेचे 4 कोटी गेले परत

खर्च न केल्याने जिल्हा परिषदेचे 4 कोटी गेले परत 

प्रतिनिधी /सोलापूर :

सध्या जिह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलव्यवस्थापनची अनेक कामे जिह्यात सुरू आहेत. तर दुसरीकडे अनेक कामे पूर्ण न केल्याने जिल्हा परिषदेचा 4 कोटी रूपये निधी परत गेला आहे. त्यामुळे आज, गुरूवारी झालेल्या जलव्यवस्थापनच्या बैठकीत काम न करणाऱया अधिकाऱयांवर सदस्य आक्रमक झाल्याचे दिसून आले.

 जिल्हा परिषद येथे जलव्यवस्थापन समितीची बैठक उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 3 वाजता झाली. या बैठकीस सभापती मल्लिकार्जून पाटील, रजनी देशमुख, सदस्य सुभाष माने, मंगल कल्याणशेट्टी, स्वाती शटगार आदी उपस्थित होते. बैठकीच्या सुरवातीला पुलवामा येथे शहिद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहून सभेस सुरवात केली.

 या सभेत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 2017-18 मध्ये एकूण 589 कामे घेण्यात आली होती. त्यातील 553 कामे पूर्ण झाली आहेत. यासाठी आतापर्यंत 23 कोटी 23 लाख रूपये इतका निधी खर्च झाला आहे. तर 2018-19 मध्ये एकूण 199 कामे घेण्यात आली होती. त्यातील 176 कामांचे प्रशासकीय आदेश मंजूर झाले आहेत. 145 कामांचा शुभारंभ झाला आहे. 64 कामे पूर्ण झाली असून 28 कामे प्रगतीपथावर आहेत. यासाठी सध्या 1 कोटी 55 हजार रूपये निधी खर्च झाला आहे.

  जिल्हा नियोजन समितीकडील आणि जिल्हा परिषद सेस फंडातून अनेक कामे सुरू आहेत. यातून हजारहून अधिक कामे सुरू असून त्यासाठी 14 कोटी रूपये पर्यंत निधी खर्च झाला आहे.