|Thursday, May 23, 2019
You are here: Home » Top News » आसाममध्ये विषारी दारूमुळे 17 जणांचा मृत्यू

आसाममध्ये विषारी दारूमुळे 17 जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / गुवाहाटी :

आसाममधील गोलाघाट जिलह्यात विषारी दारू प्यायल्याने 17 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी (21 फेब्रुवारी) दारू प्यायल्यानंतर काही जण आजारी पडले होते. दारू प्यायल्याने अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तातडीने गोलाघाट येथील शहीद कुशल कंवर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, विषारी दारू प्यायल्याने 21 लोकांची अचानक तब्येत बिघडली होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्यापही अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्मयता आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दारूचे नमूने घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. विषारी दारू ही शहराच्या बाहेरून आणली होती. ही दारू उत्पादन शुल्काच्याच काही कर्मचाऱयांनी आणल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. प्रशासनाने याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

Related posts: