|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » मनोरंजन » सावित्रीबाईंची गाथा आता रूपेरी पडद्यावर

सावित्रीबाईंची गाथा आता रूपेरी पडद्यावर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सामाजिक विषमतेच्या विरोधत उभे ठाकून स्त्री शिक्षणाचे व पर्यायाने स्त्रीमुक्तीचे दार उघडणारे थोर समाजसुधरक महात्मा फुले आणि सावित्राबाई फुले यांचा जीवनसंघर्ष लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ यांचा जीवनपट यशस्वीरित्या रुपेरी पडद्यावर साकारणारा दिग्दर्शक समीर विद्वांस पुन्हा एकदा हे शिवधनुष्य उचलणार आहे.

   समीर विद्वांस याने स्वतःच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. ‘आपल्याला इतिहास नीट शिकवलाच गेला नाही. इतिहासाच्या सनसनावळय़ातच आपण अडकून राहिलो. अनेक थोर व्यक्तिमत्त्वांशी आपली ओळखच झाली नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाई हे त्यांच्यापैकीच एक असून त्यांच्याबद्दल वाचल्यानंतर मी हेलावून गेलो आहे. ’ज्योतिबासावित्री’ची गाथा आपण आधीच सांगायला हवी होती. पण उशीर झालेला नाही. मी काम सुरू केले आहे,’ असे समीरने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

Related posts: