|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 6726 विद्यार्थी

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 6726 विद्यार्थी 

  • पाचवीसाठी 45 केंद्रे, 4121 विद्यार्थी
  • आठवीसाठी 35 केंद्रे, 2605 विद्यार्थी
  • 24 रोजी 1 ते 5 या वेळेत होणार परीक्षा

प्रतिनिधी / ओरोस:

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून 24 रोजी होत असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पाचवीतून 4121 आणि आठवीतून 2605 असे एकूण 6726 विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. यावर्षी ही परीक्षा दुपारी एक वाजल्यापासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा वेळेपूर्वी किमान 45 मिनिटे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अखिल भारतीय सैनिकी शाळा प्रवेश प्रक्रिया परीक्षा याच दिवशी होत असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी परीक्षा वेळेत बदल करण्यात आला आहे. दुपारी 1 ते 2.30 आणि सायंकाळी 3.30 ते 5 या वेळेत शिष्यवृत्ती परीक्षा पेपर होणार आहेत.

 पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा 45 केंद्रांवरून, तर आठवीची परीक्षा 35 केंद्रांवरून घेण्यात येणार आहे. परीक्षार्थींना दुपारच्या पहिल्या पेपरसाठी दुपारी 12.30 ला बैठकीच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार असून 12.40 ला पेपर देण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी 12.30 पूर्वी परीक्षा केंद्रावर किमान 15 मिनिटे उपस्थित होणे अपेक्षित असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पाचवीसाठी मराठी माध्यमाचे 3252, उर्दू माध्यमाचे 24, इंग्रजी माध्यमाचे 623, सेमी इंग्रजीचे 205, उर्दू इंग्लिश माध्यमाचे 17 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.  आठवी शिष्यवृत्तीसाठी मराठी माध्यमाचे 1820, उर्दू माध्यमाचे 24, इंग्रजी माध्यमाचे 515, सेमी इंग्रजी माध्यमाचे 233, तर उर्दू इंग्लिश माध्यमाचे 13 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

 एका वर्गात 24 विद्यार्थी या प्रमाणे बैठक व्यवस्था राहणार असून प्रवेश पत्राशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. कोणत्याही कारणामुळे परीक्षा देणाऱया विद्यार्थ्याला लेखनिकाची (रायटरची) आवश्यकता भासल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य आहे. ते सादर केल्यासच लेखनिकाची सुविधा उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले.

 परीक्षेमध्ये काही नवीन बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार एबीसीडी प्रकारचे प्रश्नसंच असणार आहेत. पहिल्यानंतरला ए, दुसऱयाला बी, तिसऱयाला सी व चौथ्याला डी असे पेपर देण्यात येणार असून 5 नंबर बाकावरील विद्यार्थ्याला पुन्हा ए प्रकारातील प्रश्नसंच दिला जाणार आहे. कॉपी करणे वा बघून पेपर लिहिण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी ही पद्धत अवलंबिली जाणार आहे. उत्तरपत्रिकेवर विद्यार्थ्यांचे नाव व बैठक क्रमांक छापूनच दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिकेची कार्बन कॉफी दिली जाणार आहे. निकाल पत्रकावर पात्र-अपात्र असा शेरा दिला जाणार आहे. 40 टक्के गुण मिळविणारा विद्यार्थी पात्र समजला जाणार आहे. मात्र शिष्यवृत्ती लाभासाठी गुणानुक्रमे यादी निश्चित केली जाणार आहे. 1 ते 2.30 या वेळेत होणाऱया पहिल्या पेपरचा रंग गुलाबी, तर 3.30 ते 5 या वेळेत होणाऱया दुसऱया पेपरचा रंग निळा असणार आहे.

Related posts: