|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सुरक्षा परिषदेत पाकिस्तानची कोंडी

सुरक्षा परिषदेत पाकिस्तानची कोंडी 

संयुक्त राष्ट्र / वृत्तसंस्था :

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) हा दहशतवादी हल्ला अत्यंत भयानक आणि भ्याड असल्याचे सांगत कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे. सुरक्षा परिषदेने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा उल्लेख करत अशा हल्ल्यांसाठी जबाबदार दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. परिषदेत मांडण्यात आलेल्या ठरावाला चीनसह सर्व देशांनी संमती दिल्याने पाकिस्तान एकाकी पडला असून हा त्यांना मोठा झटका समजला जात आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 15 देशांचा समावेश असून यामध्येही चीनदेखील आहे. सुरक्षा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीवेळी दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱयांवर कारवाई करण्यासाठी भारताला शक्मय ती मदत करण्याचे आवाहन केले. त्यामुळे पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मोठय़ा प्रमाणात समर्थन मिळत असल्याचे दिसत आहे. संयुक्त राष्ट्राकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये मसूद अझहर म्होरक्मया असणाऱया पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा उल्लेख केला आहे. चीनने नेहमीच मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या मागणीला विरोध केला आहे. मात्र, सुरक्षा परिषदेत या मुद्दय़ावर चीनने पाठिंबा दर्शवला आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेतील भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी परिषदेतील ठरावाबाबत समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे.

चीनचा भारताला पाठिंबा, पाकिस्तानला दणका

जगभरातून दबाव वाढत असतानाच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला दणका बसला आहे. सुरक्षा परिषदेत भारताने मांडलेल्या प्रस्तावाला चीनने पाठिंबा दिल्यामुळे पाकिस्तानला हादरा बसला आहे. जगातल्या सर्व बडय़ा देशांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानची निर्भत्सना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा परिषदेत पुलवामा हल्ल्याचा निषेध करणारा ठराव मांडण्यात आला. या ठरावात पाकिस्तान मदत करत असलेल्या ‘जैशöए-मोहम्मद’ या संघटनेचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. आत्तापर्यंत भारताने जेव्हा जेव्हा ‘जैश’चा प्रमुख मसूद अजहर याच्यावर बंदी आणण्याचा प्रस्ताव आणल्यानंतर चीनने त्याला विरोध केला होता. त्यामुळे चीनच्या आजच्या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

ठरावाचे पालन करण्याचे आवाहन

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व सदस्यांनी यावेळी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसहित भारतीय जनता आणि सरकारप्रती सहानुभूती व्यक्त केली. दहशतवादी हल्ल्यांचा कट रचणारे तसेच रसद पुरवणाऱयांवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. आम्ही सर्व देशांना आंतरराष्ट्रीय कायदा बंधने तसेच सुरक्षा परिषदेच्या ठरावाचे पालन करत भारत सरकार आणि इतर सर्व तपास यंत्रणांना सहयोग करण्याचे आवाहन करतो’, असे सुरक्षा परिषदेत स्पष्ट करण्यात आले आहे. 

Related posts: