|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दहशतवादाला ठेचणारच

दहशतवादाला ठेचणारच 

वृत्तसंस्था /जयपूर :

दहशतवादाचे उच्चाटन व्हावे, हीच 130 कोटी देशवासीयांचीही इच्छा आहे. हा बदलेला भारत आहे. आता दु:ख सहन करून शांत बसणार नाही. राजकारणापेक्षाही राष्ट्रनीती आणि राष्ट्राचे सुरक्षा सर्वोच्च असल्याचेही असल्याचे स्पष्ट करत दहशतवाद्यांना कशा पद्धतीने ठेचायचे ते आम्हाला माहिती आहे. दहशतवादाला ठेचणारच, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्त केला. आमचा लढा हा काश्मीरसाठी आहे. आम्ही दहशतवादविरोधात लढत असून काश्मिरींविरोधात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशात विविध ठिकाणी काश्मिरी तरुणांवर होत असलेले हल्ले दुर्दैवी आहेत, असेही त्यांनी सांगितले.

शनिवारी राजस्थानमध्ये लोकसभा प्रचाराच्या शुभारंभानिमित्त आयोजित  विजय संकल्प सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. यावेळी मी त्यांना गरीबी आणि अज्ञानाविरोधात लढा देण्याचे आवाहन केले होते. यावेळी त्यांनी ‘मी पठाण आहे’, असे सांगत आपली शेखी मिरवली होती. आता ते आपला शब्द किती खरा करतात हेच भविष्यात पाहायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

           मानवतेच्या संरक्षणासाठी दहशतवादविरोधात लढा

जगभरात दहशतवादाविरोधात जनमत तयार होत आहे. दहशत माजविणाऱयाविरोधात ठोस कारवाईसाठी आम्ही सर्व पातळीवर प्रयत्न करत आहोत. 130 कोटी देशवासीयांची ही इच्छा आहे. राजकारणापेक्षाही राष्ट्रनीती आणि राष्ट्राचे सुरक्षा सर्वोच्च असल्याचेही त्यांनी नमूद केले. पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र सरकारने घेतलेल्या धडक निर्णयांमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. यापुढे फुटीरवाद्यांविरोधात ठोस कारवाई केली जाईल. हा बदलेला भारत आहे. आता दु:ख सहन करून शांत राहणार नाही. दहशतवाद्यांना कशा पद्धतीने ठेचायचे ते आम्हाला माहिती आहे. केंद्र सरकारने भारतीय सैन्यदलास पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. मानवतेच्या संरक्षणासाठी आमचा लढा दहशतवादाविरोधात आहे, काश्मिरींविरोधात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related posts: