|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जयविजय विद्यामंदिर यश

जयविजय विद्यामंदिर यश 

प्रतिनिधी /जयसिंगपूर :

येथील जयविजय विद्यामंदिरची साक्षी शामराव झोरे (इयत्ता 7 वी) हिने मराठा युवक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या शिवकालीन व्यक्ती रेखा एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.

ज्ञानेश्वरी जयसिंग इरकल (इयत्ता 6 वी) हिने वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक तसेच असावरी मशाळकर (इयत्ता 4 थी) हिने गोराबा मंडळामार्फत झालेल्या तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला.

शाळेच्यावतीने विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिशु विकास मंडळाचे अध्यक्ष विजय मगदूम, उपाध्यक्षा ऍड. सोनाली मगदूम, संस्था प्रशासन अधिकारी संदिप रायाण्णावर यांचे प्रोत्साहन तर मुख्याध्यापक माने, शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.